सुप्त आवाज जो विसावला….

सुप्त आवाज जो विसावला….

       श्री. अ‍ॅंक्टन समोरील खड्ड्याजवळ ठेवलेल्या त्यांच्या ४० वर्षाच्या मुलाच्या कबरीवर, मातीची एक शेवटची ओंजळ टाकत होते. गतकाळाचे जणू एक चित्रणच त्याक्षणी त्यांच्या डोळ्यासमोरून जात होते. चाहत्यांचा भलामोठा गोतावळा त्यांच्या लाडक्या व्यक्तीला शेवटचा एक अलविदा करण्यास तिथे जमला होता. त्याक्षणी प्रत्यक्ष तिथे हजर असलेल्या किंवा सोशल मीडीया व इतर माध्यमातून एकत्र आलेल्या करोडो लोकांचा निरोप घेऊन सगळ्यांचा लाडका असलेला तो आत्मा आपल्या शेवटच्या प्रवासाला निघाला होता. त्याच्या त्या अचानक मृत्यूने अनेकांच्या मनाला चटका लागून गेला होता.

जगातील एका मोठ्या वर्गाने त्याला आपल्या मनातला आवाजच मानले होते. अत्यंत वरच्या पट्टीत गाणारा तो, त्याच्या आवाजामुळे अनेकांचा जीव की प्राण बनला होता. बर्‍याच जणांनी आपापल्या मनात दडपून ठेवलेल्या भावना, जगासमोर बोलून न दाखवण्याच्या भीतीपोटी अनेकांनी मनात तशाच ठेवलेल्या कल्पना अन संकल्पना या कमकुकमकुवत देहाच्या माणसाने खणखणीत आवाजात आणि वेळ पडल्यास बेंबीच्या देठापासून ओरडून जगासमोर आणल्या होत्या. तो एक जनमानसांत प्रसिद्ध आणि प्रोय असा गायक आणि गीतकार होता. अंतर्मुखी विचारांचा मात्र तितक्याच हिमतीने षड्ज लावत, पट्टी हलू न देता गाणारा, एक जबरदस्त रॉकस्टार ‘लेस्टर मॅथ्यू अ‍ॅंक्टन’. ४८ तासांपूर्वी त्याने वयाच्या ४० व्या वर्षी स्वत:ला फास लावून घेतला होता. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांचे आणि संगीत विश्वातील त्याच्या मित्रपरिवाराचे मन हेलावले होते. त्याचा ‘वेस्टर्न पार्क’ हा ६ जणांचा रॉक बॅंड होता. त्या बॅंडचा तो लीड सिंगर होता. त्याच्या बॅंडचे इतर सहकारीसुद्धा त्याच्या अशा स्वेच्छेने जाण्याने प्रचंड चिंतीत आणि दु:खी झाले होते. त्याच्यामागे त्याची बायको आणि ४ मुले होती. कुठलीही पूर्वसूचना न देता एका आलिशान हॉटेलच्या खोलीत, त्याने स्वत:ला फास लाऊन घेतले होते, तेही प्रसिद्धिच्या उच्च शिखरावर असताना!

श्री मॅथ्यू अ‍ॅंक्टन, समोरच्या कबरीत शांत झोपलेल्या लेस्टरचे वडील, त्यांनी कबरीखाली सोन्याच्या पाटीवर लेस्टर मॅथ्यू अ‍ॅंक्टन १९७७-२०१७ लिहीलेल्या भागावरून अलगद हात फिरवला आणि त्या कबरीच्या पायांशी डोके ठेवले. त्यांना बाजूला करून ती कबर खड्ड्यात ठेवण्यात आली. त्यावर असंख्य फुलांचे गुच्छ ठेवण्यात आले, आणि मग त्यावर माती टाकताना मॅथ्यू प्रचंड रडले. काहीच क्षणात तो रिकामा खड्डा एक थडगे बनले. त्यावरही अनेक गुच्छ ठेवण्यात आले आणि रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी ते थडगे पुरते झाकण्यात आले. लेस्टरच्या कुटुंबाचे बरेचसे सदस्य त्या कार्यक्रमाला आले होते, मात्र सर्वांनी मॅथ्यूची भेट घेणे, त्याला सांत्वना देण्याचे टाळले. त्यातला एक होता, जो त्या थडग्यावरून उठायलाच तयार नव्हता. त्याने आपली मान त्याच्या पुढील दोन पायांच्या मध्ये आणून ठेवले. आणि तो आवाज करत आसवे ढाळू लागला. त्याची आई त्याला तिथून उचलून नेत होती. मात्र तो काही तिथून हटायला तयार नव्हता.

मॅट (मॅथ्यू) थडग्याच्या दुसर्‍या बाजूने हे सगळे पाहत होता. त्याला त्या मित्रा (अमेरिकेत कुत्र्याला फ्रेंड म्हणतात) ला इतके भावनाविवश झालेले पाहून विशेष वाटले. मॅट आपळ्या डोळ्यातून वाहणारा ओघ पुसत मोठ्याने म्हणला, “लेस्टरचे सर्व प्रकारचे चाहते आणि मित्र होते, हे मला आज कळतंय!” असं म्हणत ओठ दाबत मॅट पुन्हा रडू लागला. मित्राच्या आईने (कुत्र्याची मालकीण) मॅटकडे रागाने पाहिले, आणि ती म्हणाली, “त्याच्या कमजोर बनण्याला तूच जबाब्दार आहेस, तो आयुष्यभर पश्चाताप, शरम आणि उध्वस्त बालपणाच्या आठवणी घेऊनच जगला. आणि या सगळ्याला तू जबाबदार होतास, तूच! तूच जीव द्यायला भाग पाडलंयस त्याला.” असे म्हणत ती आई तिथून निघून गेली. मॅट मात्र ते सगळे ऐकून मोटःयाने, “नाही असे काही झालेले नाही, लेस्टर मला तसे कधीच म्हणला नव्हता” असे मोठ्याने ओरडत, गळून तिकडेच गुडघ्यांवर बसला. तो रडून पुरता लाल झाला होता. त्याने थडग्याकडे वळून लेस्टरच्या डोक्याच्या भागावरून हात फिरवला आणि म्हणाला “सांग ना लेस्टर, तुलाही तेच वाटते का, जे ती ह**** बाई बोलून गेली? नाही ना?” मॅटचे हात त्या फुलांनी सजवलेल्या थडग्यावर फिरत होते.

“तू लहानपणापासून प्रचंड गोड आणि छान होतास. बारीक बांधा तुझा, म्हणजे कुणाचाही धीर सुटेल रे, असा होतास तू, नाहीतरी मला माझ्या बायकोने सुख कुठे कधी दिले? अन् तुझ्या सावत्र आईनेही नाही” असे म्हणत मॅट स्तब्ध झाला. “मी लहानपणी तुला दिलेल्या वेदनांची जाणीव आणि त्याचा पश्चाताप मला पुढे तुझ्या बर्‍याचशा गाण्यातून नक्कीच झाला होता. पण त्यामुळे तू इतका उध्वस्त होशील याची जाणीव मला त्यावेळी झालीच नाही.”

मॅट टिव्हीवर एक इंटरव्ह्यू पाहत होता, समोर टेबलावर बर्‍याचशा रिकाम्या बिअरच्या बाटल्या आणि त्यासोबत चीझ क्युब्झ. ज्याचा इंटरव्ह्यू घेतला जात आहे त्याच्या चेहर्‍यावर अनेक ठिकाणी टोचून घेतलेले, उघड्या हातांवर अनेक रंगीबेरंगी टॅटू, वर लाल रंगाने रंगवलेले उभे केलेले केस. डोळ्यांवर गॉगल असा सगळा प्रकार केलेला ऐन विशीतला एक तरूण मुलगा, चेस्टर. तो त्याच्या बालपणाबद्दल सांगत होता, “लहानपणी मी म्हणजे कुटुंबातील एक असा सदस्य होतो, ज्याच्यावर माझे पालक आपापला राग, आपापल्या पद्धतीने काढून मोकळे होत असत. मी घरी एकटा असताना माझे वडील नेमकं काय करायचे मला कळंत नसे, आणि शाळेतही मला कमकुवत असल्याने काहीजण समलिंगी सुद्धा म्हणत असत. मी अभ्यासात आणि शरीराने कमजोर नक्कीच होतो, पण समलिंगी अजिबात नव्हतो. आयुष्य म्हणजे संगीतच आहे, संगीतच आयुष्य आहे. संगीतावर प्रेम करा. संगीतानेच मला आज जो मी आहे ते बनवले आहे, वेस्टर्न पार्कने मला मी आज जो आहे, ते बनवले आहे! आमच्या चाहत्यांनी आम्हाला आमचे स्थान दिलेले आहे आणि आम्ही जे करू ते आमच्या चाहत्यांसाठीच!”

स्क्रीनकडे पाहताना मॅटचे डोळे पाणावले होते, त्याने कॉर्डलेस फोन उचलला आणि एक नंबर डायल केला. पलीकडे लेस्टरने फोन उचलला. कापर्‍या आवाजात मॅट म्हणाला “मला तुला भेटायचंय लेस्टर, मला खरंच तुला पाहायचंय!” लेस्टरचे उत्तर होते, “पण मला तुला कधीच पाहायचं भेटायचं नाहीए मॅट, आयुष्यभरात कधीच नाही आणि मेल्यानंतरही नाही.” समोर थडग्यावरील लेस्टरचा फोटो पाहत मॅट ओक्साबोक्शी रडत म्हणाला, “मला क्षमा कर रे लेस्टर, प्लीज मला क्षमा कर आता तरी, प्लीज.”

लेस्टरचे काही सुरक्षा रक्षक आणि काही माणसे थडग्यापाशी पोहोचली आणि त्यांनी मॅटला आधार देत उचलले. त्यातल्या एकाने मॅटला भानावर आणले. “मॅट तुझ्या चुकीची पुरेशी शिक्षा तुला मिळाली आहे, ऊठ, हे काही त्याने तुझ्यामुळे केलेले नाहीये, जगच वाईट होते आणि तरीही त्याने स्वत:चे नाम कमावलेच, त्याचा तुला गर्वच असायला हवा! ऊठ बघू.” इतका वेळ स्वत:ला सावरून, चषँयाची काच साफ करत उभा राहत असलेल्या मॅटच्या लक्षात आले की त्याला आधार द्यायला त्याचा भाऊ ब्रेट आला होता. “आपल्या मुलाने आयुष्यभरासाठी त्याच्या बापाचे तोंड न पाहण्याचे ठरवल्यावर मी कसला गर्व बाळगावा असं म्हणतोस तू?” या प्रश्नाने निरुत्तर झालेला ब्रेट तरीही मॅटला सावरत त्या कबरस्तानाच्या बाहेर घेऊन गेला.

दोन-चार दिवसांनंतर, वृद्ध मॅट एकटाच अ‍ॅटॉर्नीच्या ऑफिसमध्ये जाऊन परत येत होता. लेस्टर त्याच्या नावावर काही पैसे ठेऊन गेला होता. ते मिळवण्यासाठी मॅट अ‍ॅटॉर्नीची भेट घ्यायला गेला होता. येताना तो काचेच्या एका इमारतीसमोरून जात होता. ‘मिडलटन स्क्वेअर बिल्डिंग’.

मिडलटन स्क्वेअर बिल्डिंगमध्ये तिसर्‍या मजल्यावर लेस्टरच्या नव्या ‘न्यू मेटल साइड’ नावाच्या अल्बमचे पहिले सादरीकरण होत होते. तरूण, मध्यमवयीनच काय पण म्हातारेसुद्धा त्याची गाणी ऐकण्यास आली होती. काहीजण लेस्टरच्या नावाने आरोळ्या ठोकत होते, तर काही मुली अन् बायका त्याला ओरडून लग्नाच्या मागण्या घालत होत्या. मॅटचे लक्ष तिसर्‍या माळ्यावरील गॅलेरीत उभे राहून गाणी सादर करणार्‍या बॅंडकडे होते. आणि त्यातही त्याच्या मुलाकडे लेस्टरकडे होते. लेस्टर सर्वात वरच्या पट्टीत गाणे म्हणत होता आणि मध्येच लक्ष मॅटवर स्थिर करत होता. ‘मी एक असे मेटल होतो, केलास ज्याचा तू भुगा!’ हे शब्द मॅटच्या कानावर पडले, लेस्टर मॅटच्या डोळ्यांत डोळे घालून आवेशाने ते गात असल्याचे मॅटच्या लक्षात आले. दुसर्‍याच क्षणाला ते सगळेकाही रिकामे झालेले होते. जुन्या आठवणींचा एक झटका होता तो. मॅटने त्याची हॅट काढली आणि स्वत:च्या अर्धटक्कल डोक्यावरून हात फिरवला. त्याने चष्मा काढला, आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसून टाकले. तो बसण्यासाठी जागा शोधत होता. समोरील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात लेस्टरच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करणारे काही संदेश होते. त्यामधील टिव्हींवर लेस्टरच्या गाण्यांचे व्हिडिओ, मुलाखती, त्याच्या निधनामुळे सोशल नेटवर्कवर पोस्ट झालेल्या संदेशंची संख्या यासारख्या बातम्या दाखवल्या जात होत्या. त्यामधील एका मुलाखतीअधील त्याचे शब्द होते, “बालपणात, अगदी १० वर्षांचे असताना तुमच्या अगदी जवळच्यांनीच तुमचे लैंगिक शोषण केल्यावर काय होते ना, ते मी भोगले आहे, त्यानंतर तुमचीच तुम्हाला लाज वाटत राहते, तेही मी सहन करत आलो आहे. माणसांतून उठवू शकतात या घटना एखाद्याला!” हे सगळे तो येत असलेले रडू लपवत, खोट्या हास्यासह बोलत होता.

तरूणपणातला लेस्टर, केसांच्या जटा घेऊन, चमकणार्‍या लाल ट्रॅकपॅंट आणि शर्टसह, मॅटशी बोलत होता. “लेस्टर मी आणि तू जिला या घरात आणलंस ना, ती तुझी दुसरी बायको माझी सावत्र आई आम्ही तुला सोडून निघून जातोय, तुझ्या त्रासाला……ह्म्म जाऊ देत, तू कसला सुधारतोयस, चल निघतोय आम्ही,बाय!” हातात एक बिअरची बाटली घेतलेला लेस्टर त्याच्या सावत्र आईसोबत घर सोडून निघून गेला. लेस्टरने शेवटचे एकदा मॅटकडे वळून पाहिले, मात्र तोपर्यंत स्क्रीनवर समाप्तची पाटी आली होती.

मॅट त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून बाहेर आला आणि त्याने त्याचा छोटासा फोन बाहेर काढला, त्याने लेस्टरच्या बायकोला, वेंडीला कॉल लावला. “हाय मॅट” इतकेच बोलून कॉल कट झाला. मॅटला असे घडणार याची कल्पना होती. त्याने पुन्हा एकदा कॉल केला मात्र व्हॉईसमेल नंबरवर. एक व्हॉइसमेल सोडला. “हाय! मला फक्त तुम्हा दोघांचे आभार मानायचे आहेत, मला माफ करा करा, असंच कुठलीही कल्पना न देता मी थेट तुझ्या घरच्या फोनवर इतक्या वर्षांनी कॉल करत आहे, सर्वात मोठा मूर्खपणाही ठरू शकेल हा, पण खरंच!” त्याचा आवाज खर्जात गेला, “त्याने कधीच मला मी कुठे चुकत असल्याची, किंवा वाईट वागत असल्याची कल्पना दिली नव्हती. माझी चूक माझ्या लक्षात येईपर्यंत त्याने जगात नाव कमावले होते. संपूर्ण जगाला तो आवडायला लागला होता. म्हणजे नजरेसमोर असतानाही मला त्याला प्रत्यक्ष सामोरे जाताही येत नव्हते आणि तसे धारिष्ट्यही होत नव्हते. त्याच्या प्रसिद्धीच्या वलयाने मी पार दिपून गेलो होतो. मात्र आता निदान तू तरी मला सांगू शकलीस, की त्याने मरणे का पसंत केले? अक्ख्या जगाचे मन जिंकणारा माझा लेस्टर नेमका असा का हरला? जीव दिला त्याने?” असे म्हणत मॅथ्यू रडू लागला आणि कॉल स्वत:च बंद केला.

रडताना त्याला वेंडीचाच परत कॉल आला. त्याने पटकन डोळे पुसत कॉल घेतला आणि तिने काही बोलण्याआधीच, “प्लीज एकदा शेवटचं मला त्याच्याबद्दल जाणून घेऊ दे, तो जिवंत असताना तर कधी मला त्याच्याबद्दल त्याच्यासोबत बोलता आले नाही, पण निदान तुझ्यासोबत एकदा, मला ते बोलायचे आहे.” त्या बाजूने वेंडीसुद्धा रडू लागली आणि तिने फोन ठेऊन दिला. मॅट तिथून पुढे त्याच्या हॉटेलच्या दिशेने चालू लागला. विचाराचे जाळे त्याच्या डोक्यात पसरले होते. इतका तिरस्कार करूनही, लेस्टरने जाताना मॅटच्या नावे एक करोड रूपये सोडले होते. मॅटचे आता कुणीच शिल्लक नव्हते. कारण लेस्टरच्या लहानपणी मॅटने त्याला दिलेल्या वाईट वागणूकीमुळे त्याचे नातेवाईकही त्याला पसंत करत नव्हते. पुढील आयुष्यात लेस्टरने प्रसिद्धी कमावल्यामुळे आणि त्याच्या आयुष्याची संपूर्ण कथा जगासमोर आल्यामुळे मॅटचे आयुष्य अवघडच झाले होते. त्याची बायको त्याला सोडून लेस्टरसोबत निघून गेली होती.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता मॅट एका बागेजवळ आला. तिकडे त्याला बसायला बेंच सापडला. त्या दिशेने जातानाच त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. अमॅंडा, लेस्टरच्या वेस्टर्न पार्कची जुनी बॅंड मॅनेजर. जी चेस्टरच्या बालपणी फिनिक्स गावात त्यांच्या शेजारीच राहत असे. अमॅंडा लुईस ही लेस्टरची वर्गमैत्रिणसुद्धा होती. पुढे ती शिकागोमध्ये असताना ती लेस्टरच्या बॅंडमध्ये सहभागी झाली. ती मॅटलाही ओळखत होती, तिने त्याला पाहिल्यावर लांबून त्याला हात दाखवला. ती तिच्या ६ वर्षांच्या लहान मुलीसोबत त्या बागेत आली होती. मॅटलाही तिला तिथे पाहून बरे वाटले, कारण त्याच्या ओळखीचे, त्याच्याशी बोलायला कुणीतरी त्याला दिसले होते. संभाषणे लेस्टरच्या मृत्यूने सुरू होणे साहाजिक होते. मॅटला लेस्टरच्या खाजगी गोष्टी माहीत होऊ लागल्या. कसा लेस्टरने त्याच्या २० व्या वर्षीच ‘शून्य’ नावाचा बॅंद तयार केला. मॅटच्या मार आणि त्रास देण्याने लेस्टरल्या ऐन उमेदीच्या काळात ड्रग्ज आणि दारूने कसे वेढले होते हे सगळे मॅटला आज कळले. मॅटच्या लेस्टरला बडवण्याने आणि त्याने केलेल्या लैंगिक छळामुळेच लेस्टर कसा एकलकोंडा झाला, आणि व्यसनांच्या आहारी गेला, हे सगळे कळल्यावर मॅटला स्वत:चीच लाज वाटू लागली. अमॅंडाने लेस्टरचे भरपूर फोटो मॅंअतला दाखवले. ओहायो शहरातील पहिल्या परफॉरमन्सपासून ते त्याने ठरवलेल्या त्या आयुष्यातील शेवटच्या वर्ल्ड टुअरच्या मजेशीर फोटोंपर्यंत सगळे फोटो मॅटला बघायला मिळाले. लेस्टरच्या पहिल्या ग्रॅमी पुरस्काराचे फोटो, व्हिडिओ आवडीने शांत सिंफनीझ ऐकताना काढलेले फोटो हे सगळे पाहून मॅटला प्रचंड आनंद होत होता. कारण आजवर त्याने लेस्टरला फक्त कुठल्या पोस्टर, टिव्हीवरील व्हिडिओमध्येच पाहिले होते. मॅट एक कामगार असल्यामुळे त्याला रॉक हा संगीत प्रकार काही आवडत नसे, म्हणून तो केवळ लेस्टरला पाहण्यासाठी व्हीएच1 वर आवाज बंद करून पाहत असे. लेस्टरबद्दलच्या या आठवणी पाहून आणि ऐकून लेस्टरने संगीतातला एक वेगळाच दर्जा गाठल्याचे मॅटला लक्षात आले होते.

अमॅंडाच्या मते, जरीही लेस्टर मॅटचा तिरस्कार करत असला तरीही, त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव म्हणजे त्याच्या आई-वडीलांचे वेगळे होणे हेच असल्याचे लेस्टर अमॅंडाला बर्‍याचदा म्हणला होता. तसेच त्याला स्वत:ला व्यसनांच्या अधीन होऊन पडून राहणे पसंत पडत नव्हते, लेस्टर स्वत:मध्ये एक नव्हे तर दोन व्यक्ती असल्याचे कायम बोलत असे, एक जो स्वत:शीच झगडत आहे आणि दुसरा जो या व्यसनांमुळे बनला असून जो लेस्टरला अजिबात आवडत नाही. व्यसने लेस्टरला करावी लागत नाहीत, तर तो व्यसनांचा आश्रित झाल्याचेही लेस्टर म्हणत असे, त्याने समुपदेशनए घेऊन काही वर्षांपूर्वीच दारू आणि व्यसने सोडून दिली होती, मात्र एका अगदी जिवलग मित्राच्या अचानक आत्महत्या करण्याने लेस्टरच्या भावनांचा बांध फुटला आणि त्या रात्री पुन्हा त्याने दारू आणि अंमली पदार्थांना स्पर्श केला असे अमॅंडा मॅटला सांगत होती.

सूर्य मावळत चालला होता त्यामुळे अमॅंडाची निघायची वेळ झाली होती. तिने मुलीला बोलावले, आणि मग ती तिची मुलगी आणि मॅट तिघेही पुढे चालू लागले. काहीच अंतरावर मॅटचा जाण्याचा रस्ता वेगळा होणार होता. त्याच वळणावर ते दोघेही थांबले. अमॅंडा म्हणाली, “ मॅट तुला माहीतीये का? आज लेस्टरचे थडगे जिथे आहे ना, त्याच्या अगदी शेजारीच लेस्टरच्या त्या जिवलग मित्राचे थडगे आहे, दोघेही गायक होते, दोघेही खूप प्रसिद्ध होते, दोघानांही खूप लोक पसंत करत असत, दोघेही व्यसनांच्या आहारी गेले होते, आनि दोघांनीही आत्महत्त्य केली. कारण एकच, एकटेपणा! मॅट आयुष्यात कधी कुणीही कुणाला एकटे पाडू नये, किंवा एकटेपणाकडे वळण्यास भाग पाडू नये. असे मला तरी वाटते….” इतका वेळ इकडे-तिकडे पाहत बोलत असलेल्या अमॅंडाने मॅटला सहानुभूतीने मिठी मारली आणी तिने मॅटचा निरोप घेतला.

मॅट तसाच त्या वळणावर उभा राहिला. सूर्यप्रकाश अगदीच कमी झाला होता आणि त्याच्या मागील बाजूस असलेल्या पूलावरील दिवे लागले होते. खाली नदीतून लहान होड्या परत आपल्या घराकडे परतत होत्या. तो पूलाच्या खांबापाशी उभा राहून त्याने चष्मा आणि डोक्यावरील हॅट काढली, आणि सोबत असलेल्या लहानशा बॅगेतून टिश्यूपेपर काढून आपले अर्धटक्कल पुसले. पुलावर लागलेल्या त्या पिवळ्या दिव्यांच्या रांगांकडे पाहून त्याच्या तोंडातून आपसूक एक ओळ निघाली, हा बाप त्याच्या पुढील आयुष्यात त्याच्यासोबत असता, तर त्याने त्याला असे कधी करूच दिले नसते. आज सगळेकाही वेगळेच असते.

त्यामुळे माझ्या मते त्याचा खूनच झालाय, आणि याला जबाबदार मी आहे, त्याच्या लहानपणी मी त्याला त्रास दिलाय, त्याचे बालपण उध्वस्त केलंय, त्यामुळे तो एकटेपणाकडे वळला, व्यसनांकडे वळला, त्याच्या या सगळ्या कृत्यांना मला जबाबदार धरले जावे. कोर्टरूममध्ये स्वत:ला शिक्षा व्हावी अशी मागणी मांडून, मॅट आज जजसमोर शिक्षेची मागणी करत होता. या विचित्र मागणीने कोर्टरूम आणि वकील चक्रावले, त्यांनी मॅटचे ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, “तुमच्यामुळे झाले हे तुम्ही म्हणताय, पण लेस्टरने मरण्यापूर्वी असे काहीच लिहीलेले नाही, मग तुम्हाला स्वत:ला शिक्षा द्यावीशी का वाटते आहे?” मॅट चेहर्‍यावर एक स्मितहास्य आणत म्हणला, “ सुप्त आवाज जो विसावला, त्याचा निदान शेवट तरी गोड व्हावा!”

Advertisements

Been Doolally….

Been Doolally….

It has been steaming hot and humid in Mumbai for last few days, which actually created a good and strong reason for me to taste something really chilled and new type of drink to curb the heat. At the same time, there was a place that was ruling my mind to visit since the time, my friend had told me about this, few days ago. The place is ‘Doolally’. Me and the people in my acquaintances,who drink are mostly from ‘Drink like fish’ type. And I consider that category as a stereotype, at least when it comes to drinking. My belief has been like, we may drink like fish, but we cant digest like that, really. I might think of giving extra digestion job to my liver, but I prefer giving life to my liver at the same time. Because my liver has noone else to say “Go & get life…” 😉

So, all these things caught up together and actually took me to the wonderful place ‘DOOLALLY (Let me spell that, the way they do!!) at Bandra (w.) The locations of this chained restaurants are actually quiet, peaceful and relaxing. The management of the restaurant has taken care of keeping it at its best by adding soundproof glasses, which actually holds noises from inside & out at the same time. Simple couture, furniture gives a different look to the restaurant altogether. And the food as well as the drinks that they serve has a different taste as well.

Little bit of history about this chain goes with the challenges which the DOOLALLY Group faced at the time of forming and publicising their product, which is ‘Casted beer’. Yes, It is a microbrewery, and my people has little bit awareness about this industry. I am not saying that every segment of my society should know about beer or gather knowledge about beer, but come on, beer and alcoholism is so common in the society. In India, there are local country liquor sources spreaded all over who even sell poison drinks for nuts. What I am talking here, is about the quality which one can get in liquor that they intake. The organised way of manufacturing liquor can even save lives.

 

Factory_made_legal_desi_daru.jpg
Desi’ly Crafted…;)

But my people and my great kings are busy in running their own breweries, which is actually holding micro-brewing industry miles behind the fencing. If you are interested in knowing about DOOLALLY’s story you may by clicking on: –  http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/we-want-to-be-the-biggest-indian-craft-beer-brand-says-suketu-talekar-of-doolally/articleshow/44685479.cms   This microbrewery has branches mainly in Maharashtra and spreaded across the cities like Mumbai & Pune.

Let’s get on the table now. Yeah, it’s usually a task to get a table, right as you arrive. But luckily I found one as soon as I entered. So the first thing that impressed me about this place ( I’d stop calling it either as restaurant/pub/anything else, as its completely a different type of place) was the furniture.

030117_DoolallyTaproom-Bandra-PRPic.jpg

White coloured soft wooden furniture, grabs the attention  at first sight and also gives you a sense to drink limited as the furniture is delicate…;) Jokes apart, but they really have some good furniture here!!

Next thing that uphold my attention was the frames (beers which they serve) hanging on the wall. Each of the frame has the description about the beer. The details written there, might not be some fancy words, but they interests you to try and buy one….And off course you can try one before you buy one. You don’t need to pay for trying it!!(As we say देखनेका पैसा नहीं!!) doolally-taproom

Then next thing that has its own taste is the simple ‘A la carte’. Even I’am being too difficult to use this word, but the menu that is presented here in front of you is just a binded small book which has things which it should have. Nothing more shiny, glittery or lip smacking design, nothing at all……Just a white book and 10-15 item long one pager for Food and the beverages they serve. (lesser promises more delivering.)

beer-menu.jpg
Prices are meant to be changed…:)

2ebb9aa67e3fdd5bb76114dcaaf8b800.jpg

 

Apple cider is the best one here, so it never needs flushing out in here….its usually emptied by people for the people (for themselves off course…) So we settled on trying out ‘Hefeweizen’ which is good too. For snacking we usually prefer fries, so we ordered the same here, which came back with 5 types of sauces and yellow curry.

IMG_20170513_171558.jpg
Fries with those sauces…serves good…:)

‘Belgian witbier’ was another one to taste…..And this one we took along with the ‘Ghee roasted Arepas’. (A Venezuelan+Indian combination of Burger kind.) which had a crunchy bread and spiced up chicken which made our conversations good!! The best part about this place is the burgers, where you get choice of making your own burger. (casted again.)

Another best part here is, if you ever get bored by the company that you have, you can just cover that boredom over some card & board games. Yes, here you get some board & card games which you can play while playing with your taste buds. It is a pet friendly place so you can make your pet develop some good taste for beer. After all even your lab must be facing bad cholesterol problem, which the beer can sort out…;)

I found this place a happening but with sensibility, clean though crowded, multi-fascinating though limited options to choose from. It has a unique simplicity that oozes out of the culture of this place has. That attracted me to this place, and made my thought of visiting this place again…:)

Authentikulchas!! 

Authentikulchas!! 

This morning was started with reading the newspapers. Let me tell you that the only part I check in the newspaper is either the food related articles/reviews or articles related with certain new places which I can travel to. Rest other pages has something that either the press is pressed to publish or press is used to pressurise us on thinking twice about living in the existing house or to move into some new ‘townships’ which they call.

So today I read about some street food joints around my city (off course there’s only city that exist for me in the world, Mumbai.) A picture that grab my attention and that crave for breakfast suddenly hit my taste-buds was Amritsari Kulchas. Wooow!!! The picture of it was so unhealthy!!! For last few days,  my ‘sinny tongue'(that does sin at almost all of its works) was pinching me to serve her with some spicy food item, (only chillies could have killed her demands forever though) and was showing non-co operation to any other food that I was serving her. Then I found this joint name along with a tempting photo of their delicacies in the newspaper and it just hitched my hunger for a moment. The butter spreaded over that ‘Kulcha’ in the photograph reminded me with a saying in my mother tongue which says ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ (I will eat it with butter or would prefer staying  starving) But I couldn’t really keep my words as mom presented the one & only, official breakfast of Maharashtra ‘कांदेपोहे’ (Rice fried with onions  and turmeric in it.) Which is equally tempting and best one to kill any other craves,suddenly raised in mornings. So I settled my breakfast on those Kandepohes….But I knew, the day was not going to be like that….(I know that sounds like a turning point of some heroic adventure story..)

During summers I’ve observed that you don’t really feel like eating anything solid, rather demands for liquids increases. (And when you are living with parents, list of liquids shortens too…) So lunch was settled on Thandai & lots of Thandai (An Indian dry fruit-milk delightful mixture). This gave me some really peaceful sleep for the noon. (its actually like a beer’s hangover let me tell you!!…;) )

As I got up, I was shocked to see a platter of Kulchas full of Chole (Spicy chick peas gravy) and Onion salad was being served in simple coned plates (one you see in the image above.) My friend was appreciating me for making this wish and ask him to join me. There were very few but really finger-smakin good varieties being served in my plate. All were Kulchas but fillings were different. Different ‘fillings’ were developing ‘feelings’ of buying the next variety of Kulcha.;) But the best one we both liked were ‘Mixed Double cheese’ and ‘Mixed double Cheese Paneer Kulchas.’

mixed double.jpg

Before we finish these Kulchas and pay the bill let me tell you that I’ve cut our journey to ‘Sainath Fast food‘ in ‘Chembur’. where we found these authentic Amritsari Kulchas being served at absolutely reasonable prices. Before you finish eating your all orders, no one else gets their order, so please be quick while hogging and ordering here. Outlet is small, taste is amazing, chefs are just couple of them and the best part is its Tandoor (Furnace where Kulchas are baked). This Tandoor is specially made and being fixed here from Amritsar, Punjab (a place where Kulcha is originated from). And they change this Tandoor after every 3-4 years, but the make is from Amritsar. So probably this tradition of furnace adds the authentic taste to the Kulchas, that are served here. Because there’s a shop next to it, which serves the Kulchas too, but the taste is here, where we landed.

We hope this post has moved you…moved you to try these Authentikulchas!!! (Authentic Kulchas)

#poem#That one tree on the border.

#poem#That one tree on the border.

While reading few poems in regional language of India, I came across a meaningful poem which was of free text genre, Not so glittery words, but simple & touching way of writing is what forced me to make it a mention here.

While reading what I feel about the poet is he must have seen this whole scenery while passing by & that clicked his imagination to turn it into a poem. The original poem is written in Marathi language (Indian regional language from western part of the country)

Original Name: – वेशीवरचं ते एक झाड (That one tree on the Border.)

That one tree  on the plateau used to be sad and lonely.

Its branches were spreaded all over, but without any green sign.

Neither it had shade to let, nor it had any company of birds & their chirps.

Whatever it had was the spirit to exist & the saddened lonely life.

That empty plain had its existence though,

but tree thinks, it doesn’t  even has that existence

which that dry,almost dead tree couldn’t really accept.

The tree was surrounded with lushly green ground,

That was the reason for its sad lonely sound.

the killer,hungry  pest had taken its control

That tree had separated two parts of land,

It was actually become a medium of peace for both parts,

Tree hadn’t realised its own importance,

But the world in where forests were being destroyed for deciding borders,

This tree had become a line for deciding border of the two pieces of land.

-unknown

——————————————————

This whole poem is really raw in it’s way, unstructured & even very simple. In fact it’s difficult to call it a poem really, but it has a strong meaning which I realised at the end of the read. One doesn’t really understands the meaning of his own existence but, many of times your presence matters a lot to the world. You might find your life meaningless, but your existence in this world always has some meaning though you don’t know it.

Tree is used as a symbol of an individual who has lost his everything & living a life just with a hope.But his existence has a meaning like the tree is actually standing in between two lands and deciding their borders, so that land can be in peace, so as the owners of that land.

The Message that has come out of this set of lines is really amazing. isn’t it.